महिलांच्या रिक्षा परवान्यातील अटी शिथील करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा पुढाकार

04 May 2017 , 06:02:36 PM

"हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत " महिलांना दिल्या जाणाऱ्या रिक्षा परवान्याच्या काही अटी शिथील करण्याबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज परिवहन मंत्री व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मागच्या वर्षी ही योजना सुरु करण्यात आली होती. या मागण्या विचारात घेऊ असा सकारात्मक प्रतिसाद रावते यांनी दिला. तसेच ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही प्रयत्न करेल. जेणेकरुन पिडीतांना रोजगार प्राप्त होऊ शकेल.

या होत्या मागण्या...
- महिला रिक्षाचालकांच्या ऑटोरिक्षामध्ये सुरक्षेच्या दृष्टिने पॅनिक बटन असावे
- GPRS ची सुविधा बसवावी. ज्यामुळे त्यांचे लोकेशन कळून ती यंत्रणा संबंधित कंन्ट्रोलशी कनेक्टेड असावी.
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी १००% कर्जपुरवठा करतांना शासनाकडून त्यांना मिळालेल्या एक लाख रू. अनुदानापैकी ७०,०००/- बँकेमध्ये हमी म्हणून ठेवायचे आहेत. ही अट शिथील व्हावी.
- शासन निर्णयानुसार ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाना एक लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले त्यांनाच या योजनेसाठी पात्र ठरवले जाते. तसे न करता सरसकट आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सामावून घ्यावे.
- रिक्षांना जाहिराती लावण्याची मुभा असावी ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल.

संबंधित लेख