पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे

04 May 2017 , 09:19:02 PM

पुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे यांनी केले.

संबंधित लेख