वादळी पावसात दगावलेल्या चिमुरडीच्या कुटुंबियांची आ. जयंत पाटील यांनी घेतली भेट

08 May 2017 , 10:14:50 PM

राज्यात काही जिल्ह्यातील भागांना गारपीट व वादळी पावसाने तडाखा दिला आहे. शनिवारी संध्याकाळी सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथील खुंदलापूर या धरणग्रस्तांच्या वसाहतीमधील ४० घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त परिसराला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. येथे डोक्यात पत्रा पडल्याने अंकिता घोलप या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अंकिता सावंत ही मुलगी गंभीर जखमी आहे. आमदार जयंत पाटील यांनी अंकिता घोलप हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या पावसात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना राजारामबापू साखर कारखान्याच्या माध्यमातून मदत केली जाईल, असेही त्यांना जाहीर केले. यावेळी आमदार जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख