शरद पवार यांनी घेतला माण-खटाव तालुक्यातील जल संधारणाच्या कामाचा आढावा

09 May 2017 , 10:03:58 PM

माण-खटाव तालुक्यातील जवळपास ७२ गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. यातील बिदल व किरकसाल या गावांना आज माननीय खासदार शरद पवार यांनी भेट दिली. 

यावेळी श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांनी जल संधारणाच्या कामासाठी यांत्रिकीकरणाच्या बाबतीत मदत हवी असल्याची गरज बोलून दाखवली. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून काम करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी खासदार फंड देण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या फंडाचा विनियोग करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

संबंधित लेख