दिंडोरी आणि परभणी प्रकरणातही लवकर न्याय मिळावा – चित्रा वाघ

10 May 2017 , 09:23:16 PM

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील भगिनी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच पोलीसही महिलांवर अत्याचार करत असल्याचे दिंडोरी प्रकरणात समोर आले. परभणी जिल्ह्यातही एका भगिनीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे प्रकरणही समोर आले होते. कोपर्डीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेच. पण दिंडोरी आणि परभणी प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सहकाऱ्यांसहित गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

दिंडोरी प्रकरणात मुंबईतील भायखळा पोलिस स्टेशनच्या पोलिस शिपायाच्या तात्काळ निलंबनाची मागणी व परभणीच्या आपल्या भगिनीला न्याय मिळवून देण्याच्या मागण्या यावेळी चित्रा वाघ यांनी केल्या.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निर्भया केसचा निकाल नुकताच लागला. २००७ च्या बिबवेवाडीतील शुभदा पाटील प्रकरण आणि २००९ मधील पुण्याच्या नयना पुजारी केसचा देखील निकाल लागलेला आहे. वर्षानुवर्ष आपण या निकालांची वाट पहात होतो, अखेर दोषींना फाशीची शिक्षा मिळाली.
 याप्रमाणेत दिंडोरी आणि परभणी प्रकरणातही लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षा चित्रा वाघ यांनी बोलून दाखवली. अर्थात भेटी घेऊन, निवेदन देऊन आमचा लढा थांबणार नाही तो चालूच राहिल, असं त्यांनी यावेळी नमूद केले.

संबंधित लेख