खा. शरद पवार यांनी ऐकली समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांची बाजू

10 May 2017 , 10:42:23 PM

सरकारतर्फे प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा, अशी शहापूर तालुक्यासहित राज्यभरातील महामार्गबाधित शेतकऱ्यांची मागणी आहे. या महामार्गामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी नेस्तनाबूत होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याविषयी आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. तसेच येत्या २९ मे रोजी ठाणे ते नागपूर मध्ये ज्या ज्या ठिकाणी या महामार्गाला विरोध करणाऱ्या समित्या गठित झाल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन पुढची रणनीती ठरवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार, विद्याताई खाडे, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे उपस्थित होते.

संबंधित लेख