संघर्षयात्रेचा चौथा आणि शेवटचा टप्पा १६ मे पासून – सुनिल तटकरे

12 May 2017 , 05:36:32 PM

शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेचा चौथा व शेवटचा टप्पा १६ मे पासून सुरू होणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आशीर्वाद घेऊन या यात्रेची सुरुवात केली जाईल. तसेच ज्या ठिकाणाहून आंबेडकरांनी पाण्यासाठी लढा दिला त्या चवदार तळ्याला देखील भेट दिली जाईल. यात्रेची सांगता सिंधुदुर्गातील बांदा येथे होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच सरकारने तूर खरेदीबाबत केलेसा विलंब, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकर्यांशना उद्देशून वापरलेल्या अश्लाघ्य भाषेवरही त्यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.

संबंधित लेख