संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची १७ मे पासून सुरुवात

16 May 2017 , 06:49:38 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांना सुरु केलेल्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात १७ मे पासून रायगड किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन होईल. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला त्या महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे रत्नागिरी येथे प्रवास करत भरणे नाका व बहादुरशेखवाडी येथे अनुक्रमे संघर्षयात्रेचे आगमन व स्वागत केले जाईल. त्यानंतर चिपळूण येथील सावर्डे या गावी जाहीर सभेला संबोधित करून दिवसाची सांगता केली जाईल.

संबंधित लेख