संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत बीड येथे युवकांचा मेळावा

19 May 2017 , 10:50:06 PM

बीड येथे तरूण कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तरूणांच्या भविष्याचा विचार करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, असे सांगतानाच कार्यकर्त्यांच्या अडचणींची मला जाणीव असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन संग्राम कोते पाटील यांनी याठिकाणी बोलताना दिले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर, युवक अध्यक्ष शफिक शेख, बीड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, मेहबूब शेख, महेश धांदे, रवी शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख