हो, आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी मागण्याचा नैतिक अधिकार आहे – सुनिल तटकरे

20 May 2017 , 07:20:00 PM

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे संघर्षयात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर लक्ष्य साधले. युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, त्यांना वेळप्रसंगी कर्जमाफीही देण्यात आली, त्यामुळे त्यांच्यासाठी कर्जमाफी मागण्याचा आम्हाला पूर्णपणे नैतिक अधिकार आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करताना उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेवर तटकरे यांनी येथे बोलताना टीका केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खा. निलेश राणे, राजेश टोपे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, सुनिल केदार व अन्य नेते उपस्थित होते.


संबंधित लेख