दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जळगावात मोर्चा

06 Jan 2016 , 06:00:25 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. उत्तर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. 

दुष्काळ मदत निधीचे वाटप करण्याकरिता ज्या जाचक अटी लावल्या आहेत, त्यात शिथिलता आणावी. ओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी, तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयांनी त्यांच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यापीठासमोर मांडून त्यावर चर्चा करावी, अशा मागण्या या मोर्चाद्वारे मागण्यात आल्या असल्याचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील स्पष्ट केले.

संबंधित लेख