सॅनिटरी पॅड्स जीएसटी मधून वगळण्यात यावेत – चित्रा वाघ

29 May 2017 , 11:11:54 PM

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महिलांसाठी नित्योपयोगी अशा सॅनिटरी पॅड्सवर १२ टक्के जीएसटी कर लावण्यात येणार आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज मुंबई येथे स्वाक्षरी मोहिम रावण्यात आली. या मोहिमेचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं. या मोहिमेत असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. दरम्यान सॅनिटरी पॅड्सला जीएसटीतून पूर्णपणे वगळ्यात यावं ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली आहे.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की सॅनिटरी पॅड्स म्हणजे महिलांसाठी जीवनावश्यक वस्तू. राज्यातील २० टक्के महिलांना सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय हेच माहित नाही. आर्थिक कारणांमुळे ग्रामीण भागातील जनता सॅनिटरी पॅड्सचा उपयोग करू शकत नाही. त्यामुळे अनेक स्त्रियांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. सरकारने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करत सॅनिटरी पॅड्स जीएसटीतून वगळावे.

संबंधित लेख