शहरांपासून गावांपर्यंतचा ओबीसी समाज राष्ट्रवादीच्या पाठिशी उभा राहणार – ईश्वर बाळबुधे

01 Jun 2017 , 05:39:16 PM

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे विदर्भ दौऱ्यावर असून आज भंडारा येथे सेलतर्फे त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहरांपासून गावांपर्यंतचा ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अथक प्रयत्न केले आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणून हा समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विसरणार नाही, असे ते म्हणाले.

या बैठकीत प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अवीनाश गोतमारे, सतिश ईटकेलवार, प्रकाश वांगे, दिनकर वानखेडे, अभिषेक कारेमोरे, तोमेश्वर पंचभाई आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख