राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडत आहे – शरद पवार

03 Jun 2017 , 07:39:00 PM

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडत आहे. शेतकऱ्यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असला तरी शेतमाल, दूध यांची नासाडी न करता गरीबांमध्ये त्याचे वाटप करा तसेच सामान्यांशी नाळ घट्ट करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित लेख