नांदेड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे चक्काजाम आंदोलन

09 Jun 2017 , 07:19:35 PM

प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना अटक व सुटका

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी समाजातील प्रत्येक घटक करत असताना याच मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नांदेड शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. यावेळी युवकचे शहराध्यक्ष फिरोज लाला, प्रदेश उपाध्यक्ष किशोर देशमुख आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान कोते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली व जामिनावर सोडण्यात आले. 

मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा विचार करत नाही, असा आरोप संग्राम कोते पाटील यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग आता सदाभाऊ खोत गप्प कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सदाभाऊ खोत यांना फक्त मंत्रीपदाची भूक होती. त्यांना शेतकऱ्यांबाबत काही घेणं देणं नाही, असं म्हणत संग्राम कोते पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

संबंधित लेख