शरद पवार यांनी वर्धापनदिनी कार्यकर्त्यांशी व्हीडिओद्वारे साधला संवाद

09 Jun 2017 , 07:32:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सहकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा जीव ओतून काम करणाऱ्यांचा पक्ष आहे, असे सांगतानाच आपण सगळ्यांनी बळीराजाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेऊया, आत्महत्येच्या विचारांपासून त्याला परावृत्त करुया, त्याच्या रास्त मागण्या त्याच्या पदरात पडतील याची काळजी घेऊया, असे त्यांनी आवाहन केले आहे.


संबंधित लेख