सत्तेची ताकद कितीही मोठी असली तरी जनतेसमोर सत्तेला झुकावंच लागतं – सुनिल तटकरे

14 Jun 2017 , 08:44:29 PM

मराठवाडा दौऱ्यादरम्यान हिंगोली येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला. तसेच, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले.

जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट कोसळलं तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसाठी धावून गेली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ दौऱ्याच्या माध्यमातून पवार साहेबांनी सर्वात आधी उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली होती, त्याचं फलित म्हणजे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय, असे तटकरे म्हणाले. तसेच, हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपण या मेळाव्यात येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला इथे एक नंबरचा पक्ष बनवण्याचा निर्धार करूया, असे आवाहन त्यांनी केले. सत्तेची ताकद कितीही मोठी असली तरी जनतेसमोर सत्तेला झुकावंच लागतं म्हणून शेतकऱ्यांची मागणी सरकारला मान्य करावी लागली. सरकारने कर्जमाफी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्यापासूनच बँकांमध्ये जावे, जुने कर्ज माफ करून घ्यावे, तलाठ्याकडून सातबारा कोरा करून घ्यावा, असा सल्ला तटकरे यांनी दिला.

सध्याच्या अकार्यक्षम सरकारवर मात मिळवण्यासाठी आपण कंबर कसायला हवी. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधावा. त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, त्याचं निस्सारण करावं. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर द्यावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी आपल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर चोख उत्तर द्यायला हवं पण कोणत्याही समाजाची भावना दुखावणार नाही याची खबरदारीही घ्यावी, असे अजित पवार यांनी याठिकाणी सांगितले. स्व. आर.आर.आबा सर्वसामान्यांतून आलेलं नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांनी आबांचा आदर्श घेऊन काम करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विरोधी पक्षांसह काढलेल्या संघर्षयात्रेमुळे संघर्षाची ठिणगी पेटली आणि त्याचं रुपांतर जनआंदोलनात झालं. सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाची दखल घ्यावी लागली. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भविष्यातही घेईल, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख