राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

20 Jun 2017 , 05:30:30 PM

अंबड येथे मुक्ताईनगर ते पंढरपूर (मुक्ताबाई)ची दिंडी आली होती. यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. याचा ३२५ पेक्षा जास्त वारकऱ्यांनी लाभ घेतला.अनेक वारकरी पायदुखी,आम्लपित्त, सर्दी, अतिसार यांसारख्या आजारांनी त्रस्त आढळून आले. यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश ढेम्बरे, डॉ. रामनाथ तिकांडे, डॉ.गोपाळ अडाणी, डॉ.दीपक उगले, डॉ.राहुल बागुल यांनी रुग्णतपासणी केली. तसेच श्री. ज्ञानेश्वर गाडे, श्री. दिगंबर माळवदे, श्री. कैलास शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केला. भर पावसात आणि लाईट नसतानाही मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात झाले ही तपासणी पार पडली.

संबंधित लेख