शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व मदतीसंदर्भातील अटी जाचक अटी रद्द करण्यासाठी धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

21 Jun 2017 , 08:05:55 PM

शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याच्या घोषणेच्या अमलबजावणीची चिन्हे दिसत नाहीत, त्यातच खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज उपलब्ध करुन देताना सरकारने घातलेल्या जाचक अटी पाहिल्यास राज्यातील बहुतांश गरीब, गरजू शेतकरी मदतीपासून मोठ्या प्रमाणावर वंचित राहण्याची भीती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील शासननिर्णयातील अटी जाचक व चुकीच्या असल्याचे सांगितले. त्या अटींची चिरफाड करुन त्यात कोणती सुधारणा अपेक्षित आहे, याचे सविस्तर निवेदनही मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिले व त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी आमदार सतीश चव्हाण व जयंत जाधव हे उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सात पानी निवेदनात शासननिर्णयातील अटींचा उहापोह करुन या अटी शेतकऱ्यांना मदतीपासून कशा वंचित ठेवणाऱ्या आहेत हे स्पष्ट केले. शासननिर्णयात ३० जून २०१६ रोजीच्या थकबाकीदारांचाच कर्जमाफीसाठी विचार करण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. कारण, ३१ मार्च २०१७ अखेर राज्यातील ८० टक्के शेतकरी थकबाकीदार झाले आहेत, त्यामुळे आज अखेर थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी अशी मागणी मुंडे यांनी निवेदनात केली आहे.

संबंधित लेख