पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत घेतली शरद पवार यांची भेट

27 Jun 2017 , 07:13:56 PM

शेतकरी आंदोलनाचा एल्गार सर्वप्रथम जिथून झाला त्या अहमदनगरमधील पुणतांबा येथील शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरद पवार यांना भेटलं. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केलेली आहे अशांचं प्रतिनिधीत्व हे शिष्टमंडळ करत होतं व त्यांनी कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अवघे २५ हजार अनुदान राज्य सरकारने दिल्याबद्दल आपली नाराजी पवारसाहेबांजवळ व्यक्त केली व यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे रदबदली करावी अशी विनंती केली.

संबंधित लेख