सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अकोला येथे घेतली सुप्रिया सुळे यांची भेट

27 Jun 2017 , 09:07:13 PM

खासदार सुप्रियाताई सुळे संवाद दौऱ्यानिमित्त अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाध्यक्ष विजय देशमुख व राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या  डॉ. आशा मिरगे यांच्यासह सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली होती. सावकार, जिल्हा उपनिबंधक आणि साहाय्यक निबंधक यांच्या अभद्र युतीमुळे शेतकरी नाडला जात असल्याचे सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आले. अकोला जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या ताब्यात आहेत. मागच्या वर्षभरात १८७ सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी आशाताई मिरगे यांनी शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्या आहेत.

सावकारग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे पुढील तीन महिन्यांत निकाली काढण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील अवैध सावकारांचा बिमोड करण्यासाठी तालुकास्तरावर पथके कार्यान्वित करण्यात येतील. जे साहाय्यक निबंधक दोषी आढळले त्यांना निलंबित करण्याचे, आश्वासन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले आहे.

संबंधित लेख