शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

27 Jun 2017 , 10:21:48 PM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात काल दिल्ली येथे आदरणीय शरद पवार साहेबांसमवेत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. त्यांनतर राज्य सरकारच्या भूमिकेत सकारात्मक बदल दिसून आले. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका विशद केली आहे. या चर्चेचे फलित बघता सरकारकडून असलेला प्रस्ताव आणि पवार साहेबांनी सुचवलेल्या बऱ्याचशा बाबींचा समावेश आजच्या कर्जमाफीत झालेला दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केली आहे.

संबंधित लेख