नवी मुंबई येथे सुनिल तटकरे व अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप

15 Jul 2017 , 06:48:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या राज्यातील दौ-याच्या दुसऱ्या टप्प्याचा आज नवी मुंबईत समारोप झाला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या लोकांना एकसंध ठेवण्याचं काम करायला हवं, असे आवाहन केले. तर, महापौर सुधाकर सोनवणे यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्यां नी ते आरोप सिद्ध करावेत, असे आवाहन केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंजुळा शेटये प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी माहिती दडवली तेच अधिकारी याची चौकशी करत आहेत, मात्र आम्हाला याबाबत न्यायालयीन चौकशी हवी, अशी मागणी केली. तसेच, मंजुळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार, असा इशाराही दिला.

पडतीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका काबीज करून नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी पक्षाला नवसंजीवनी दिली. आता मागे हटायचं नाही यशाची सुरुवात झाली आहे. ताकदीने उभं राहून इतिहास घडवू, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे ,जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, आ. प्रमोद हिंदुराव, आ. जयदेव गायकवाड, मुनाफ हकीम, संजीव नाईक, स्मीता पाटील, संदिप नाईक, अॅड. निरंजन डावखरे, माजी महापौर सागर नाईक यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख