आदिवासी विकासासाठी आघाडी सरकारने आणलेल्या योजना आज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत – चित्रा वाघ

15 Jul 2017 , 08:22:26 PM

नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आदिवासी विकासासाठी ज्या ज्या योजना आघाडी सरकारने केल्या होत्या, त्या योजना सरकारतर्फे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोप केला. भाजपने मोठा गाजावाजा करत अब्दुल कलाम अमृत आहार योजना बनवली. पण ज्या महान व्यक्तीचे नाव योजनेला दिले, त्या नावाला साजेसे असे काम होत नाही, अशा शब्दांत टीका केली.

या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रवक्ता सेल राज्यप्रमुख प्रदिप सोळुंखे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित, माजी आमदार शरदकुमार गावित, नंदुरबार जिल्हा प्रभारी उमेश पाटील, सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख आमदार अॅड. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख