ही तर पीडितांची चेष्टा - चित्रा वाघ

19 Jul 2017 , 09:57:23 PM

मनौधर्य योजनेंतर्गत बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्यात पीडित झालेल्यांना ३ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे केली जायची. या मदतीची मर्यादा ३ लाखांवरून १० लाख रूपये करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकार पीडितांची चेष्टा करतंय असं म्हणत सरकारवर टीका केली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अशा निधींचा उपयोग करण्याची वेळ येऊच नये असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे. १० लाख रुपयांची घोषणा करणाऱ्या पंकजा मुंडे यांना महिती द्यावीशी वाटेल की निधीअभावी आतापर्यंत पीडित महिलांना ३ लाख रुपयेही मिळालेले नाहीत. सरकारने आधी त्या पीडितांना मदत करावी नंतर १० लाखांच्या घोषणा कराव्यात. हे सरकार प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा घोषणा करतं अशा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

संबंधित लेख