समृद्धी महामार्ग रद्द होण्यासाठी राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

21 Jul 2017 , 10:49:27 PM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी आज शहापूर मध्ये २५० महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा या आंदोलनात सहभागी झाले होते. पावसाळी अधिवेशनात समृद्धी महामार्ग रद्द व्हावा, हा विषय लावून धरू अशी घोषणाही त्यांनी केली.
समृद्धी महामार्गाचा मुद्दा गाजत असून शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी गिळंकृत करणाऱ्या या प्रकल्पाला विविध स्तरांवर विरोध होत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.

संबंधित लेख