नागपुरात विमलाश्रमातील मुलांसोबत अजितदादांचा वाढदिवस साजरा

25 Jul 2017 , 06:46:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलद्वारा विधिमंडळ पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवस जेष्ठ समाजसेवी रामभाऊ इंगोले यांच्या 'विमलाश्रम' येथील अनाथ मुलांसोबत साजरा करण्यात आला. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आश्रमाला धान्य व तेल भेट देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थींना कपडे, बिस्कीट पॅकेट, शालेय पुस्तके, नोटबुक्स भेट देण्यात आले.

पर्यावरणाच्या बाबतीत #अजितदादा नेहमी सजग असतात त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आदरणीय अजित दादांचा दिर्घ आयुष्य लाभावे, असे मनोगत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहूने ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, रामभाऊ इंगोले, समाजसेवी डॅा. जयश्री मीत्रा, आळंदीचे किर्तनकार ह.भ.प. रामेश्वरजी घागरे, महिला अध्यक्षा अल्का कांबळे, अर्चना हरडे, प्रकाश वांगे, दिनकर वानखेडे उपस्थित होते.

संबंधित लेख