कसा होणार भ्रष्टाचार मुक्त भारत? - जितेंद्र आव्हाड

02 Aug 2017 , 06:03:31 PM

मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या समस्यांवर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर आ. जितेंद्र आव्हाड यांनी आपले मत व्यक्त केले.

कचऱ्यामुळे मुंबई शहराचे वाटोळे झाले आहे. नालेसफाईच्या भ्रष्टाचाराने मिठी नदीचे प्रदूषण वाढले. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र भारत भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची भाषा करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला संदीप येवले या व्यक्तीला विकासकांकडून १ कोटी रुपयांची लाच दिली जाते. त्यातील ४० लाख रुपयांची लाच माध्यमांसमोर उघड केली जाते, तरीही अॅंटी करप्शन ब्युरो किंवा ईडी चौकशी करत नाही. संदीप यवले यांनी ज्या विकासकांची नावे घेतली त्या विकासांनी लाच दिल्याचं कबूलही केलं तरी कोणतीही कारवाई होत नाही. ही आश्चर्याची बाब आहे.

महालक्ष्मी येथील एस. आर. ए. प्रकल्पात ओंकार बिल्डरला ३० फुट खोल, ४० फुट रूंद नाला ठेवण्याचे सांगितले गेले. पण त्याने १२ फुट लांबी आणि ८ फुट खोलीचा नाला बनवला. या गोष्टीची तपासणी करण्यासाठी पालिकेचा कोणताही अधिकारी तिथे गेला नाही. बांधकामाची तपासणी केली नाही. त्या बिल्डरने टीडीआर बिल्डिंगच्या बांधकामासाठी वापरला. झोपडपट्टी दाखवून घरे बांधली याचीही चौकशी केली गेली नाही.

एचडीआयएल या कंपनीने पत्रावाला चाळीला वाटप करण्यात आलेल्या जागेची विक्री केली आणि त्यातून भक्कम पैसा कमावला. हा गैरव्यवहार सरकारला थांबवता आला असता पण सरकारने तो थांबवला नाही. सरकारला या व्यवहारातून ५०० कोटींचं नुकसान झालं. कुर्ला येथेही असाच प्रकार झाला. या प्रकरणात माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी अवघ्या ६१ कोटीचा दंड आकारला. त्यातला १५ कोटीचा चेक बाऊन्स झाला. या कंपनीवर कारवाई करायला हवी होती पण तसं राज्य सरकारने केलं नाही. असा होणार का भ्रष्टाचार मुक्त भारत? असा सणसणीत सवाल त्यांनी सरकारला विचारला.

संबंधित लेख