प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही – धनंजय मुंडे

05 Aug 2017 , 06:06:33 PM

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आलेली आहेत. पण त्यांची चौकशी केली जात नव्हती. मोपलवार यांचा घोटाळा ज्या व्यक्तीने बाहेर काढला, त्याला धमक्या येत आहेत. त्या व्यक्तीला संरक्षण देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली.

बुधवारी आम्ही सभागृहात प्रकाश मेहता यांच्या भ्रष्टाचारावर बोललो असता सत्ताधारी सदन सोडून गेले. पारदर्शक सरकार असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांचे निलंबन करावे तसेच प्रकाश मेहता यांचा राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज करु नये अशी विरोधकांची भूमिका आहे.

संबंधित लेख