विधान सभेत पवार साहेबांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलले आ. दिलीप वळसे पाटील

05 Aug 2017 , 09:35:26 PM

आज विधान सभेत मा. खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीच्या ५० वर्षांच्या पूर्तीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी बोलताना विधान सभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी पवार साहेबांचा अभिनंदन प्रस्ताव म्हणजे गौरवाचा क्षण आहे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या कारकीर्दीत त्यांनी सतत देशाची सेवा केली आहे. पवार साहेबांमुळे खूप काही शिकायला मिळालं. एक आदर्श मतदार संघ कसा घडवायचा हे पवार साहेबांनी देशाला दाखवलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार जर कोणी जपले असतील तर ते पवार साहेबांनी, असंही ते म्हणाले. आम्ही आज कर्जमाफीची मागणी करत आहोत पण पवार साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांचं कर्ज माफ केलं होतं. पवार साहेब हे महाराष्ट्राला लाभलेले एक दूरदृष्टी नेतृत्व आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

संबंधित लेख