सांगली जिल्ह्यात गाव तेथे राष्ट्रवादीच्या २७ शाखांचे उदघाटन

10 Aug 2017 , 06:32:10 PM

सांगली जिल्ह्यात 'गाव तेथे राष्ट्रवादी शाखा' या उपक्रमास युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस या चार तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २७ शाखांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

विविध गावांच्या शाखांचे उद्घाटन करताना युवकांच्या संघटन व कामाची दिशा स्पष्ट करताना, शासनाच्या धोरणावर कोते पाटील यांनी प्रहार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष भरत देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य शरदभाऊ लाड, बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, अनिताताई सगरे आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख