युती सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याची वेळ आणली – शंकरअण्णा धोंडगे

12 Sep 2017 , 06:13:26 PM

सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आणि त्यांचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. पिकवलेल्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल समुद्रात बुडवल्याशिवाय पर्याय नाही. या सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याची वेळ आणली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. किसान मंचाद्वारे आयोजित शेतकरी, शेतमजूर संरक्षण अभियानांर्गत ते हदगाव येथे बोलत होते.

पुढे बोलताना सरकारने शेतकऱ्यांना कायद्याने संरक्षण द्यावे अशी मागणी शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. शेतकरी संपूर्ण बाजूने नागवला आहे. तुरीला भाव नसल्याने लाखो टन तूरदाळ सडत आहे. विदर्भातील भाताच्या शेतीचं प्रतिवर्ष ३० कोटींचं नुकसान होत आहे असे ते म्हणाले. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं.

संबंधित लेख