शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सहा विभागीय मेळावे होणार– संग्राम कोते पाटील

12 Sep 2017 , 07:32:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सहा विभागीय मेळावे आयोजित केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली. या मेळाव्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. अहमदनगर येथील दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

दरम्यान आज पाथर्डी आणि शेगाव येथे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या १३ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा नेते क्षितिज घुले, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार आणि संजय कोलगे उपस्थित होते.

संबंधित लेख