कंधार-लोहा तालुक्यात धडकला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य रुमणे मोर्चा

12 Sep 2017 , 08:34:42 PM

राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करत शिवसेना-भाजपमधील लोक फक्त या पक्षातून त्या पक्षात जाण्यात मग्न आहेत. या दोन्ही पक्षातील लोकप्रतिनिधींना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वात आज कंधार-लोहा तालुक्यातील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रुमणे मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती.

शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की कंधार-लोहा तालुक्यात गेल्या तीन वर्षात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुष्काळ, नापिकी, बेरोजगारी, मंदावलेला व्यापार अशा अनेक कारणांमुळे समाजातील प्रत्येक गट निराश आहे. मात्र या युती सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष नाही.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबुराव केंद्रे, लोहा तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष उत्तमराव कोंडलवडे, जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे, संजय कऱ्हाळे, प्रल्हाद फाजगे, दत्ता कारामुंगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख