विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सज्ज...

16 Sep 2017 , 12:02:44 AM

अजितदादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी कोल्हापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत केले. या बैठकीमध्ये कोल्हापूर विद्यापीठाच्या येऊ घातलेल्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार, विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून ते निकालापर्यतच्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तत्पर राहील. संघटनेच्या माध्यमातून फक्त राजकारणच न करता विद्यार्थी हित प्राधान्याने पाहिले जाईल, असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पाटील यांनी केले. सदर आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, कोल्हापूर युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कल्पेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते अनेक उपस्थित होते.

संबंधित लेख