राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचं कारस्थान - सुप्रिया सुळे

22 Sep 2017 , 08:15:26 PM

इक्बाल कासकर प्रकरणात जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव गोवले जात आहे. पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान आखले जात आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी असल्याचे खोडसाळ वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले होते. याबाबत सांगली येथे पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सुळे यांनी हे स्पष्टीकरण दिले.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पोलिसांनी प्रकरणाबाबत मीडियासमोर माहिती कशी दिली? पोलिसांना माहिती देण्याची एवढी घाई का झाली होती, असा सवाल खासदार सुळे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी या प्रकरणात असतील आणि त्याचा काही ठोस पुरावा असेल तर नक्कीच त्यांच्यावर पक्षातर्फे कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यातील वाढत्या बलात्कारांच्या प्रकरणावर सुळे म्हणाल्या की आरोपींमध्ये पोलिसांबद्दल भीतीच राहिली नाही. मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर ते या घटना तात्काळ थांबवू शकतात. मात्र सरकारकडून कोणतेच पाऊले जात नाही.

संबंधित लेख