संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा 2 ऑक्टोबर पासून असहकार -शंकरअण्णा धोंडगे

22 Sep 2017 , 09:44:06 PM

देशातील शेतकरी आर्थिकदृष्टया कसा नागवला जाईल याचा प्रयत्न जुलमी सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रसच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. सोलापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा 2 ऑक्टोबर पासून असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतीउद्योग परवडत नसल्याचे कारण पुढे करून शेती धनदांडग्यांच्या घशात घालण्याची निती शासन राबवित असल्याची भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची नियतच खोटी असल्याचाही आरोप त्यांनी केला.

संबंधित लेख