जळगाव जिल्हाध्यक्षपदी आ. सतीशअण्णा पाटील कायम

27 Sep 2017 , 09:23:48 PM

दि. २३ सप्टेंबर, २०१७ रोजी राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, मुंबई येथे माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते मा. आ. अजितदादा पवार, जळगाव जिल्हा प्रभारी मा. आ. दिलीप वळसे पाटील तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चेनुसार सर्वानुमते जळगाव जिल्हाध्यक्ष पदी आ. श्री सतीशअण्णा पाटील यांचा पदभार कायम ठेवत त्यांच्यावर कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली. तसेच महिला जिल्हाध्यक्षापदी श्रीमती कल्पनाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्षपदी श्री. ललित बागुल, जिल्हा युवती अध्यक्षा म्हणून कुमारी कल्पिता रमेश पाटील व जळगाव शहर जिल्हा अध्यक्षपदी श्री निलेश पाटील, जळगाव शहर जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून निला चौधरी, जळगाव शहर जिल्हा युवक अध्यक्षपदी श्री. विशाल देवकर, जळगाव शहर जिल्हा युवती अध्यक्षपदी कुमारी सायली जाधव यांची अशाप्रकारे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख