महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आक्रमक

02 Oct 2017 , 07:21:54 PM

नोकरीत खेळासाठी असणाऱ्या ५% आरक्षणात सर्व प्रमुख देशी खेळांचा समावेश करण्यात यावा तसेच महाविद्यालयातील क्रिडा शिक्षकांची नेमणुक लवकरात लवकर व्हावी या मागण्यांचे निवेदन सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, लातूर, औरंगाबाद, बीड, नांदेड इ. जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

एकीकडे फुटबॉल सारख्या विदेशी खेळाला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविद्यालयातील क्रिडा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. हा विरोधाभास आहे. सरकारने या सुचनांकडे गांर्भीयाने लक्ष घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित लेख