राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शासनाच्या उदासिन धोरणांचा निषेध

02 Oct 2017 , 07:26:08 PM

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या निष्क्रिय व उदासिन धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाउस, येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने 'अन्न सुरक्षा कायदा' तसेच 'अंत्योदय' योजना बंद केल्यामुळे राज्यातील गरीब जनतेला त्रास होत आहे. गरीबांचे शोषण थांबविण्यासाठी आघाडी सरकारने राबविलेल्या योजना कार्यान्वित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनामार्फत देण्यात आली.

संबंधित लेख