राष्ट्रवादी महिला काँग्रेस लावले मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील

24 Oct 2017 , 12:14:00 AM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील लावत सरकारचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी,राज्यातील लोड शेडिंग, रेशनिंग दुकानातून गायब झालेली साखर, महिलांची असुरक्षितता, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे कंदील लावत निषेध केला. सरकारची दिवाळी तर सामान्यांचे दिवाळे या सरकारने काढले आहे याची जाणीव सरकारला व्हावी यासाठी काळे कंदील लावल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख