विद्यार्थी बेहाल; विद्यापीठाचे कर्मचारी घेतायत सुट्ट्यांची मजा

30 Oct 2017 , 11:23:27 PM

यंदाच्या वर्षी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन पेपर तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या निकालाला अभूतपूर्व उशीर लागला. यासाठी मुंबई विद्यापीठातून हकालपट्टी झालेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख हेच कारणीभूत असून त्यांच्या अक्षम्य दुर्लक्ष करण्यामुळे मुंबई विद्यापीठाला टीकेला सामोरे जावे लागले. या सर्व गोष्टी लक्षात घेत व्यवस्थापकांच्या बेजबाबदार वृत्तीचा समाचार घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या आदेशानुसार आज फोर्ट येथील मुंबई विद्यापीठात ‘व्यवस्थापक जागो’ आंदोलन करण्यात आले. मात्र, पेपर तपासणीसाठी वेळ अपूरा पडतो, अशी कारणे देत निकालाला विलंब लावणारे व्यवस्थापक आज चौथ्या शनिवारच्या सुट्टीची मजा घेत घरी बसले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यवस्थापकांबरोबर होणा-या आजच्या बैठकीत वाढीव परीक्षा फी आणि परीक्षेत पुरवणी न देण्याच्या मुद्द्यांवरदेखील चर्चा करण्यात येणार होती.

मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, सिद्धिविनायक न्यासचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई हिंदी भाषिक अध्यक्ष मनिष दुबे, जितू म्हात्रे, आरती साळवी, वरळी तालुका अध्यक्ष अभिजित गजापूरकर, मनोज टपाल, हार्दिक जाधव, आरीज सकारीया, भिमन्ना मेठी पंकज वर्मा, पंकज पांडे, प्रशांत देवडे व इतर विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख