७ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन - शंकर अण्णा धोंडगे

13 Nov 2017 , 05:43:19 PM

शेतकरी कर्जमुक्तीसह हमीभाव व इतर मागण्यांबाबत सरकारकडे आंदोलने, विरोधी पक्षांकडून विधिमंडळातील आग्रह, न्यायालयातील लढा अशा वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. यामुळे ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने घेतला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली. किसान मंचच्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते २ ऑक्‍टोबरदरम्यान सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबवण्यात आले होते.

किसान मंचतर्फे वेगवेगळ्या संघटनांच्या राज्यकार्यकारिणी सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार निष्ठूर असल्याची भावना अनेकांनी बैठकीत व्यक्त केली. दुष्काळ, रोगराई, अतिवृष्टी व शेती उत्पादन भाव याबाबत यापूर्वी उपाययोजना होत होत्या, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी मदत दिलीच नाही, उलट जबाबदार मंत्र्यांनीही शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील बाबींवर उपहास केला, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

संबंधित लेख