आमच्या व्यथा सरकारपुढे मांडा; माणकापूरमधील शेतकऱ्यांनी केले राष्टवादीच्या नेते मंडळींकडे मन मोकळे

04 Dec 2017 , 06:19:04 PM

नागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे.

माणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली.

संबंधित लेख