आम्हाला कोणीच वाली नाही; तुम्हीच मदत करा, शिरपुरवासियांची राष्टवादीला आर्त हाक

04 Dec 2017 , 06:27:22 PM

#हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यात पोहोचली. शिरपूर येथे स्वागत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खा. सुप्रिया सुळेविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेविधिमंडळ गटनेते जयंत पाटीलआ. प्रकाश गजभियेराष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या परिसरात चार पदरी रोड होणार आहे. त्यात स्थानिकांची घरे गेली. त्यांना पैसेही दिले गेले नाही. इथले शेतकरी बोंडआळीने त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री इथे लक्ष देत नाही. साधी भेटही देत नाहीअशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या लोकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात येत्या १२ डिसेंबर रोजी लाटणं घेऊन आंदोलन करू. तुम्हाला न्याय मिळवून देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही.

संबंधित लेख