कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झालेल्या मजुराच्या कुटुंबियांची घेतली शरद पवार यांनी भेट

07 Dec 2017 , 05:54:42 PM

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या गावातील मजूर देवीदास रामा मढावी यांचा मागच्या महिन्यात किटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झाला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कळंब या गावी जाऊन मढावी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. मढावी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

संबंधित लेख