ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्यास कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत!

08 Dec 2017 , 12:38:42 AM

- संग्राम कोते पाटील यांचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी भांडुप येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यास मदत करावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. या बैठकीत पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबईच्या महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, माजी गटनेते धनंजय पिसाळ, विद्यार्थी मुंबई अध्यक्ष अमोल मातेले, अमित मिश्रा आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
ईशान्य मुंबई हा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला होता. मध्यंतरी कार्यकर्त्यांमध्ये थोडा विस्कळीतपणा आल्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कमी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा मिळवून देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घ्यावी असे आवाहन संग्राम कोते पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या सर्वच योजनांचा शो फ्लॉप ठरला आहे. डिजिटल इंडिया, स्कील डेव्हपलमेंट, नोटाबंदी या सर्वच गोष्टीत सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला नाही. सरकारचे हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडावे असेही ते म्हणाले.

संबंधित लेख