आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत सातव्या दिवसाच्या ‘हल्लाबोल’ पदयात्रेला सुरूवात

08 Dec 2017 , 06:16:42 PM

सकाळी सेवाग्राम आश्रम व पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सातव्या दिवशी पुढे निघाली. वाटेत बोंड आळीने त्रस्त शेतकऱ्यांची, दारूबंदीच्या फसव्या वास्तवाने त्रस्त महिलांची कैफियत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकली व त्यांना दिलासा दिला. आज पदयात्रेच्या सातव्या दिवशीही सारख्याच उत्साहाने व जोशाने ही पदयात्रा नागपूरकडे कूच करत आहे. उद्या सेलू येथून निघत खडकीकडे मार्गक्रमण करणार आहे.

संबंधित लेख