रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

10 Dec 2017 , 12:00:45 AM

रस्त्यावर घातली सत्यनारायणाची पूजा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे २१ दिवसांपूर्वी इशारा देऊनही रस्ता दुरूस्त न केल्याने पाडळी फाटा परिसरातील सिन्नर-ठाणगांव रस्त्यावरील खड्ड्यात सत्यनारायण पूजा करण्यात आली.

अनेक महिन्यांपासून पाडळी फाटा - ठाणगाव रस्त्याची चाळण झाली आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे हे आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते आदित्यनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पूजा घालण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रविंद्र काकड, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष युनस शेख, युवक शहराध्यक्ष दीपक लहामगे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख