‘हे सरकार आहे की मोगलाई?’; अजित पवार यांचा हल्लाबोल

11 Dec 2017 , 08:40:18 PM

सेलू येथून निघालेली पदयात्रा दर्गा शरीफ - केळझर असे टप्पे पार करत खडकी (नागपूर) येथे पोहचली. सेलू येथे सकाळी यशवंत महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी कापूस व सोयाबिनचे पिक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती दिले. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आई-वडील त्रस्त असून आमचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्यांनी केली. वर्ध्यातील शेतमजूर महिलांनी गॅसच्या वाढलेल्या दरावरून रोष व्यक्त केला. आम्हाला सबसिडी नको तर गॅसच्या किमती कमी करा, अशी मागणी या शेतमजूर महिलांनी केली. आजही ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर येऊन बोंड आळी मुळे झालेल्या नुकसानीच्या व्यथा खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत मुंडे, आ. भास्कर जाधव, माजी मंत्री अनिल देशमुख, मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर व राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांपुढे मांडत होते. शेवटी जनतेच्या यातना पाहता हे सरकार आहे की मोगलाई?’ असा सरकारवर जोरदार #हल्लाबोल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केळझर येथील सभेत केला. खडकी येथे झालेल्या चौक सभेत माजी मंत्री अनिल देशमुख व गुलाबराव देवकर व प्रदेश पदाधिकारी बसवराज पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

संबंधित लेख